11 डिसेंबर हवामान अंदाज: विदर्भ, मराठवड्यात पावसाची शक्यता

December 10, 2018 5:00 PM|

मागील काही दिवसांपासुन सम्पूर्ण महाराष्ट्रात कोरडे हवामान चालू होते पण मागील दोन दिवसात, विदर्भ आणि आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे।

दरम्यान, एक ट्रफ रेशा उत्तर कर्नाटकपासून विदर्भापर्येन्त विस्तारलेली आहे ज्युमुले विदर्भातील काही भागांवर पावसाचा ज़ोर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे । तसेच, पुढील 24 तासात मराठवड्यात एक दोन ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता आहे। याशिवाय, विदर्भात देखील एक दोन ठिकाणी गारपीट पण होण्याची शक्यता आहे।

दूसरीकडे, नागपुर, वर्धा, अकोला। चंद्रपुर, लातूर, बीड, परभणी, आणि औरंगाबादमध्ये देखील हलक्या पावसाची अपेक्षा आहे।

सध्या दक्षिण पूर्व वेगळा, विदर्भ आणि मरथवाडयात किमान तापमान समान्यपेक्षा अधिक आहे। परंतु विस्तारलेल्या ट्रफ रेशा मुले येणार्या काही दिवसात पावसाची शक्यता असून किमान तापमानत देखील घट दिसून येईल। याशिवाय, कमाल तापमानात अधीच घट दिसून आलेली आहे।

दूसरीकड़े, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोंकण व गोव्यावर सध्या ठंड वारे चालू आहे, ज्युमुले या भागातील रात्रीच्या तापमानात अजून घट नोंदविले जाऊ शकते। टायमुले वातावरणात थंडावा पसरेल। सध्या या भागांचे किमान तापमान सामान्यपेक्षा 2 ते 3 अंशनी कमी आहे। तसेच मुंबई शहरात पण किमान तापमान समान्यपेक्षा 2 अंशनी कमी आहे। गेल्या 24 तासत मुंबईत किमान तापमान 16 अंशच्या आसपास नोंदवले गेले आहे, जे या हंगामातील सर्व बहुतेक कमी तापमान आहे।

तसेच ,येणार्या दिवसात ही परिस्थिति अशीच कायम राहील आणि तापमानत फार मोट्ठा बदल दिसून येणार नाही।

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत कमाल तापमान 31 अंश से. आणि किमान 16 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान 12 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

वर्धा येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे दिवसा तापमान 32 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूर येथे दिवसा तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

 

Similar Articles