गेल्या अनेक दिवसापासून, काही क्षेत्रांमध्ये वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यांत मान्सूनचा पाऊस कमी झाला। परंतु गेल्या 24 तासांत पावसात थोडीशी वाढ झाल्याने कोकण व गोवा येथे हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली असून, विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे। बऱ्याच काळानंतर मुंबईत देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे। दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडेच आहे।
पुढील 24 तासांत विदर्भात पावसाची तीव्रता कमी होईल। प्रामुख्याने चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी पावसाचा लपंडाव सुरूच राहील। याउलट, किनारपट्टीच्या भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील परंतु या क्षेत्रात जोरदार पावसाची अपेक्षा नाही।
[yuzo_related]
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असेल तर पुणे, नाशिक, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे।
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com