[Marathi] 5 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: नागपूर व अकोल्यात मान्सूनचे पुनरागमन शक्य; मुंबई, पुणे हलका पाऊस पडण्याची शक्यता

August 4, 2017 8:22 PM | Skymet Weather Team

 

काल फक्त कोकण व गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका तर एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। मुंबईत खूपच थोडा म्हणजेच फक्त 2 मिमी पाऊस झाला, तर राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस फक्त महाबळेश्वरला ७४ मिमी इतका नोंदला गेला। एक दोन ठिकाणे वगळता विदर्भात मात्र पाऊस झाला नाही।

स्कायमेटच्या अंदाजानुसार एक नवीन हवामान प्रणाली बंगालच्या उपसागराच्या वायव्येस तयार होताना दिसत आहे। हि हवामान प्रणाली हळूहळू भारताकडे सरकेल, त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसात विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शकयता आहे।

[yuzo_related]

या मुळे येत्या २४ तासात नागपूर, अकोला, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर आणि भंडारा येथे काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होवू शकतो।

त्या मानाने मराठवाड्यात म्हणजेच, परभणी, जालना, हिंगोली आणि लातूर येथे तसेच मध्यमहाराष्ट्राच्या पश्चिमेला हवामान प्रामुख्याने कोरडेच राहील।

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

कोकणात मात्र, मुंबई, रत्नागिरी, डहाणू आणि वेंगुर्ला येथे मध्यम स्वरूपाच पाऊस होत राहील तर पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव आणि सातारा येथे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होवू शकतो।

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES