स्कायमेटने दिलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांत कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळी 8:30 वाजता केल्येल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांच्या कालावधीत, डहाणू येथे 10 मि.मी. पाऊस, मुंबई 6 येथे मिमी, सातारा 5 येथे मिमी, नाशिक येथे 3 मिमी आणि पुणे येथे 1 मिमी झाला.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा मात्र जवळपास कोरडेच राहिले. याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात किंवा जवळच्या भागांवर कोणत्याही प्रकारची हवामान प्रणाली दिसत नाही.
आमच्या अंदाजानुसार नजीकच्या काळात कोणत्याही हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता नाही. म्हणून, मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात कमीतकमी एका आठवड्या साठी दडी मारण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
तथापि, कोकण व गोव्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि नजीकच्या मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पाऊस होवू शकतो.
पुढील 24 तासांत मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, रत्नागिरी, डहाणू आणि वेंगुर्ला येथे देखील हलका पाऊस होत राहील.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
विदर्भ आणि मराठवाड्यात वातावरण प्रामुख्याने कोरडे राहील. नागपूर, अकोला, नांदेड, परभणी, जालना, अमरावती, चंद्रपूर, हिंगोली आणि लातूर या शहरातील हवामान कोरडे राहील.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com