गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावलेली आहे प्रामुख्याने कोकण-गोवा आणि मराठवाडा विभागात अधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच गेल्या 24 तासात, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये देखील चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
तसेच कोकण आणि गोवा येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील व मुंबईत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
मात्र, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण इतर भागांच्या तुलनेत कमी असेल.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com