[Marathi] 28 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, नागपूर येथे चांगला पाऊस

August 27, 2017 6:17 PM | Skymet Weather Team


 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसा चा जोर वाढलेला आहे. सद्य हवामानाची परिस्थिती पाहता पुढील 24 तासांत मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय, विदर्भ आणि मराठवाड्यातील उत्तरेकडील भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अपेक्षा आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात देखील हलक्या सरींची शक्यता आहे. 

प्रामुख्याने हर्णे, डहाणू, रत्नागिरी, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पुणे, गोंदिया, अकोला, नागपूर, नाशिक, नांदेड, परभणी, जळगाव, यवतमाळ व औरंगाबाद या शहरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 

[yuzo_related]

सद्य हवामानाचा अंदाज पाहता गणेशोस्तवा दरम्यान देखील भाविकांना पाऊस सोबती राहणार असे दिसते. 

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES