[Marathi] 26 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुणे, अकोला, नाशिक, नागपूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस

August 25, 2017 5:24 PM|

 

गेल्या 24 तासांत, महाराष्ट्रातील अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. महाबळेश्वर, वेंगुर्ला, डहाणू, मुंबई, चंद्रपूर, औरंगाबाद आणि हर्णे या शहरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे.

पुढील २४ तासांत मात्र विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एक ते दोन जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे व पुढील दोन-तीन दिवस हवामान असेच राहण्याची अपेक्षा आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवस पुणे, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अकोला, हिंगोली, जालना आणि नांदेड अशा काही ठिकाणी चांगला पाऊस होण्यची शक्यता आहे.

[yuzo_related]

येत्या 27 ते 31 ऑगस्ट या कालावधीत कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तथापि, मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये एक दोन हलक्या सरींची शक्यता आहे. असे असले तरी सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकताRain In Mumbai

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

Similar Articles