Skymet weather

[Marathi] 25 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, रत्नागिरी, सातारा, नागपूर मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

August 24, 2017 4:52 PM |


 

महाराष्ट्रातील अनेक भागांवर मान्सून सक्रिय असून, त्यामुळे गेल्या २४ तासांत कोकण आणि गोवा या विभागांत मध्यम तर मध्य-महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

तसेच, मराठवाडा आणि विदर्भात देखील एक-दोन ठिकाणी हलक्या सरींची नोंद झालेली आहे. प्रामुख्याने मुंबई, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, हर्णे, डहाणू आणि महाबळेश्वर या शहरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाउस झालेला आहे.

पुढील २४ तासात, कोकण व गोव्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे या क्षेत्रांमध्ये एक दोन जोरदार सरींसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

[yuzo_related]

तथापि, मध्य-महाराष्ट्रात मात्र कोणतेही लक्षणीय हवामान बदल अपेक्षित नाहीत ज्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत तुरळक ठिकाणी हलक्या सरींची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

येत्या २७ आणि २८ ऑगस्ट रोजी मात्र कोकण आणि गोव्यासह मुंबई व आसपासच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हर्णे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, मुंबई, अकोला, अमरावती आणि नागपूर येथे गणेशोत्सवा दरम्यान पावसाची शक्यता देखील आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try