गणेशोत्सव महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा उत्साहात साजरा केला जातो. या दहा दिवसांत महाराष्ट्रात सर्वदूर वातावरण भक्तिभावाचे आणि उत्साहाचे असते. महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे म्हणजेच गणपती बाप्पाचे आगमन आता केवळ २ दिवसांवर आलेले आहे.
सद्य हवामानाची परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि डहाणूसह कोकण व गोव्यामध्ये पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे; तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही.
[yuzo_related]
विदर्भातील शहरांमध्ये प्रामुख्याने अकोला, नागपूर, चंद्रपूर तसेच, मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली येथे हलक्या सरींची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
याउलट मध्य-महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. प्रामुख्याने औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या शहरांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com