गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सून सक्रीय होता. तसेच गेल्या 24 तासांत, कोकण व गोवा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
प्रामुख्याने हर्णे, भिरा, डहाणू, अलिबाग आणि अकोला येथे चांगल्या पावसाची व उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलक्या सरींची नोंद झालेली आहे.
[yuzo_related]
पुढील २४ तासांत पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि वेंगुर्ला येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com