[Marathi] 22 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, ठाणे, रत्नागिरी येथे मध्यम पाऊस; पुणे, नाशिक येथे हलक्या सरी

August 21, 2017 5:14 PM | Skymet Weather Team

 

गेल्या 24 तासांत, कोकण व गोवा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

पुढील 24 तासांत कोकण आणि गोवा विभागात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील असा अंदाज असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर मात्र कमी होण्याची शक्यता आहे.

तसेच, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी याठिकाणी पुढील 24 तासांत चांगला पाऊस अपेक्षित असून नाशिक, मालेगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यात एक किंवा दोन जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

[yuzo_related]

त्यानंतर मात्र या सर्व क्षेत्रांत पावसाची तीव्रता कमी होईल. उर्वरित महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी हलक्या सरी होतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES