गेल्या 24 तासात, पावसाने कोकण व गोवा विभागात, तसेच विदर्भामध्ये दमदार हजेरी लावलेली असून, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात देखील चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, ठाणे, मुंबई आणि नांदेड या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे.
तसेच, पुढील 36 तासांत पुणे, मुंबई, महाबळेश्वर, सातारा, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, रायगड, अहमदनगर, ठाणे, सोलापूर आणि डहाणु येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
[yuzo_related]
त्यानंतर मात्र, महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, मुंबईसह महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहण्याची अपेक्षा आहे, तसेच राज्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता देखील नाकारता येत नाही.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com