[Marathi] 2 ऑगस्ट - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे हलका पाऊस; नागपूर, अकोला, औरंगाबाद येथे हवामान कोरडे राहील

August 1, 2017 6:01 PM | Skymet Weather Team

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून चा प्रभाव खूपच कमी झाला आहे।

असे असले तरी गेल्या चोवीस तासात कोकण व गोव्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असून त्या लगतच्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे। राज्यातील इतर भागात मात्र कुठेही पाऊस झाला नाही।

आमच्या अंदाजानुसार सध्या कोणतीही हवामान प्रणाली राज्यात तयार होताना किंवा महाराष्ट्राकडे सरकताना दिसत नाही। त्यामुळे पावसाचे प्रमाण अजून कमी होईल।

[yuzo_related]

येत्या चोवीस तासात नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। कोकण व गोव्यात येत्या चोवीस तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे।

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

कोकणातील पावसाचा जोर पुढील २ ते ३ दिवसात कमी होईल। परंतु किनारपट्टीचा भाग असल्या मुळे तेथे एखाद दुसऱ्या जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही।

मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस होत राहील। उर्वरित महाराष्ट्रात मुख्यत्वे करून, विदर्भ आणि मराठवाड्यात वातावरण कोरडे राहील। नागपूर, नांदेड, परभणी, अकोला, औरंगाबाद आणि वर्धा या शहरांमध्ये देखील पावसाची शक्यता खूपच कमी आहे।

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES