Skymet weather

[Marathi] 19 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: नागपूर, अकोला, गोंदिया, नांदेडमध्ये मुसळधार पाऊस

August 18, 2017 6:14 PM |


 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा लपंडाव सुरु आहे। किंबहुना, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोठेच लक्षणीय पावसाची नोंद झालेली नाही। तथापि, ओडिसावरील कमी दाबाच्या पट्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे। ज्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे।

दरम्यान, गोंदिया, अमरावती, नागपूर, अकोला, हिंगोली, जालना आणि नांदेड येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून एक किंवा दोन जोरदार सरींची शक्यता आहे। तसेच कोंकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे।

[yuzo_related]

उत्तर-महाराष्ट्रासह कोंकण व गोवा विभागातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः डहाणू, ठाणे, नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, अहमदनगर आणि औरंगाबाद याशहरांमध्ये एक दोन जोरदार सरींची अपेक्षा आहे।

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

२१ ऑगस्टनंतर मात्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होईल।

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try