महाराष्ट्रातील बहुतांश भागात विशेषत: मध्य-महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. तसेच, कोकण व गोवा येथे देखील हलक्या सरींची नोंद झालेली आहे.
गेल्या २४ तासात नाशिक, पुणे, महाबळेश्वर व अहमदनगर येथे तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
[yuzo_related]
पुढील २४ ते ४८ तासांत मुंबई, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर मध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. या उलट महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये प्रामुख्याने जालना, सांगली, सातारा, औरंगाबाद, कोल्हापूर व जळगाव या शहरातील हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com