Skymet weather

[Marathi] 12 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, रत्नागिरी, भिरा, हर्णे येथे हलका ते मध्यम पाऊस

August 11, 2017 5:15 PM |


 

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात विशेषत: मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात मान्सूनची परीस्थिती बिकट आहे। तथापि, किनारपट्टीच्या सानिध्यामुळे, कोकण व गोवा परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे।

रत्नागिरी, हर्णे, महाबळेश्वर आणि ठाणे या ठिकाणी गेल्या 24 तासांत हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली आहे।

पुढील २४ ते ४८ तासांत मुंबई, डहाणू, भिरा, हर्णे, रत्नागिरी आणि महाबळेश्वर या ठिकाणी चांगला पाऊस अपेक्षित असून सातारा, सांगली, पुणे, नाशिक आणि चंद्रपूरमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे।

[yuzo_related]

तथापि, महाराष्ट्रातील उर्वरित भागांमधे हवामान जवळजवळ कोरडे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

येणाऱ्या २४ ते ४८ तासांनंतर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, परंतु एक दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही। त्याच बरोबर, कोकण आणि गोव्या सह मुंबईत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे।

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try