[Marathi] 27 एप्रिल- विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट; पारा आणखी वाढणार

April 27, 2018 11:57 AM | Skymet Weather Team


महाराष्ट्र सध्या उष्ण हवामानाचा सामना करत आहे. खरेतर, विदर्भात काही भागांमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे. शिवाय, दक्षिणेकडील भागांच्या तुलनेत राज्यातील उत्तरेकडील भाग जास्त गरम आहे. दरम्यान, राज्यातील हवामान कोरडेच राहणार असल्यामुळे कमाल तापमान किरकोळ प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. वास्तविक पाहता, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता असल्याने अस्वस्थता जास्त असेल.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जळगाव, नाशिक आणि पुणे येथे उष्ण व दमट हवामान राहणार आहे. तसेच मुंबई आणि रत्नागिरीसारख्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये देखील उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

दरम्यान, मराठवाडा व विदर्भात किमान तापमान सामान्य पातळीच्या जवळपास असेल, तर मध्य-महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्यपेक्षा तुलनेत कमी राहील.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान ३६ अंश सेल्सियस आणि किमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सियस आणि रात्री १८ अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते

पुणे येथे कमाल ४० अंश सेल्सियस आणि किमान २२ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

रत्नागिरीत दिवसाचे तापमान ३३ अंश सेल्सियस आणि रात्रीचे तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सियस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस असेल तर किमान २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

अकोला येथे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस आणि किमान २४ अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस आणि रात्री तापमान २६ अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

जळगाव येथे कमाल तापमान ४४ अंश सेल्सियस असेल तर किमान २६ अंश सेल्सियस अपेक्षित आहे

नागपूर येथे कमाल ४४ अंश सेल्सिअस तर किमान २३ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

 

OTHER LATEST STORIES