स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात वाढ झालेली आहे. विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाट सदृश परिस्थिती देखील अनुभवली जात आहे. चंद्रपूरमध्ये बुधवारी ४५.४ अंशसेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे.
राज्यातील इतर भागांतही उष्ण तापमान अनुभवण्यात येत आहे. कोकण किनारपट्टीवरील शहरे वगळता, विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, तसेच, येणाऱ्या दिवसात ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता देखील आहे.
हवामानतज्ञांच्या अनुसार, पावसाची कोणतीही शक्यता नसल्यामुळे संपूर्ण राज्याचे हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. तसेच, तापमान ४० अंशांच्या जवळपास किंवा त्यापलीकडेच राहील.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबई येथे कमाल तापमान ३5 अंश सेल्सियस आणि किमान २6 अंश सेल्सिअस शक्यता आहे.
नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सियस आणि रात्री 23 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते
[yuzo_related]
पुणे येथे कमाल 38 अंश सेल्सियस आणि किमान 20 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे
रत्नागिरीत दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सियस आणि रात्रीचे 26 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे
कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील
वर्धामध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस असेल तर किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे
अकोला येथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस आणि किमान 28 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.
औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 40 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 24 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
जळगावात कमाल तापमान 42 अंश सेल्सियस असेल तर किमान 24 अंश सेल्सियस अपेक्षित आहे
नागपूर येथे कमाल 44 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे