[Marathi] 17 एप्रिल- विदर्भात कमी होणार पाऊस; मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या सरी सुरूच राहणार

April 17, 2018 12:14 PM | Skymet Weather Team


मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तसेच मध्य-महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली असून कोकण परिसरात मात्र हवामान कोरडेच आहे.

गेल्या २४ तासात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, ब्रह्मपुरी आणि नागपूर या भागात हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्यामुळे, तापमानात पुन्हा वाढ होवू शकते. तथापि, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाळी गतीविधी सुरू राहू शकतात. दरम्यान, कोकणात मात्र हवामान कोरडेच राहणार.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान ३3 अंश सेल्सियस आणि किमान २5 अंश सेल्सिअस शक्यता आहे.

[yuzo_related]

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सियस आणि रात्री 22 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते

पुणे येथे कमाल 38 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

रत्नागिरीत दिवसाचे तापमान 35 अंश सेल्सियस आणि रात्रीचे 26 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

वर्धामध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस असेल तर किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

अकोला येथे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 40 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 27 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

जळगावात कमाल तापमान 42 अंश सेल्सियस असेल तर किमान 27 अंश सेल्सियस अपेक्षित आहे

नागपूर येथे कमाल 39 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

 

OTHER LATEST STORIES