Skymet weather

[Marathi] 13 एप्रिल- महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

April 13, 2018 10:36 AM |


गेल्या ४८ तासांत विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामागचे प्रमुख कारण म्हणजे मध्यप्रदेश ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेला एक कमी दाबाचा पट्टा जो विदर्भ आणि मराठवाडयातून जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील इतर भाग मात्र जवळजवळ कोरडेच आहेत. तसेच सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील तापमान सामान्य पातळीच्या जवळपास आहेत. मात्र मध्य-महाराष्ट्र आणि कोकणातील तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त आहे.

स्कायमेट तज्ञांच्याअनुसार, येणाऱ्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडेच राहणार आहे. परंतु पुढील दोन ते तीन दिवसांत गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूरसह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचीशक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांत तापमान थोडी वाढ देखील अपेक्षित आहे.

[yuzo_related]

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान ३5 अंश सेल्सियस आणि किमान २3 अंश सेल्सिअस शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 39 अंश सेल्सियस आणि रात्री 20 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते

पुणे येथे कमाल 38 अंश सेल्सियस आणि किमान 21 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

रत्नागिरीत दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सियस आणि रात्रीचे 21 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

वर्धामध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस असेल तर किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

अकोला येथे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 38 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 24 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

जळगावात कमाल तापमान 41 अंश सेल्सियस असेल तर किमान 25 अंश सेल्सियस अपेक्षित आहे

नागपूर येथे कमाल 40 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try