मागील बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात हवामान कोरडेच आहे.
तथापि, गेल्या ४८ तासांमध्ये हवामानात बदल झालेला असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा या उपविभागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात ३ ते ४ अंशांनी घट देखील झाली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान कोकण आणि मध्य-महाराष्ट्रात हवामान सामान्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. शिवाय, तापमान देखील सामान्य राहील. तथापि, मध्य-महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाळी गतिविधींची शक्यता आहे.
[yuzo_related]
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबई येथे कमाल तापमान ३5 अंश सेल्सियस आणि किमान २3 अंश सेल्सिअस शक्यता आहे.
नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सियस आणि रात्री १९ अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.
पुणे येथे कमाल 37 अंश सेल्सियस आणि किमान 21 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत दिवसाचे तापमान ३3 अंश सेल्सियस आणि रात्रीचे २४ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
वर्धामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस असेल तर किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
अकोला येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.
गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।
औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 37 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 23 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.
जळगावात कमाल तापमान 41 अंश सेल्सियस असेल तर किमान 25 अंश सेल्सियस अपेक्षित आहे.
नागपूर येथे कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान २३ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.