विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रामधील बऱ्याच भागांवर उष्ण हवामानाची परिस्थिती अपेक्षित आहे. दुसरीकडे कोकण आणि गोव्याचे हवामान गरम व आर्द्र राहील परंतु दिवसा आणि रात्रीचे तापमान सामान्य राहील किंवा साधारण किंचित कमी देखील होण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
सध्या कुठलीही हवामान प्रणाली उपस्थित नसल्यामुळे महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण राहण्याची अपेक्षा आहे. विदर्भाच्या पूर्वेकडील भागावर कमी दाबाचा पट्टा असला तरी त्याचा परिणाम केवळ तेलंगाणा पर्यंत मर्यादित राहील. तसेच विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांत 7 एप्रिलच्या आसपास ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र राज्याच्या अंतर्गत भागात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहील.
मुंबई येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 39 अंश सेल्सियस आणि रात्री 20 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते. पुणे येथे कमाल 38 अंश सेल्सियस आणि किमान 20 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे
गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।
नागपूर येथे कमाल 42 अंश सेल्सिअस तर किमान 21 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. अकोला येथे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.