रविवारी विक्रमी तापमान नोंदवल्यानंतर सोमवारीही मुंबईत तीव्र उष्णतेची परिस्थिती निर्माण होत आहे. आज मुंबईकरांची दिवसाची सुरुवात सरासरीपेक्षा अधिक तापमानासह झाली.
सकाळी ९ च्या सुमारास तापमान ३२ अंश सेल्सिअस होते, जे त्या वेळेसाठी असलेल्या सामान्यपेक्षा जवळजवळ पाच अंशांपेक्षा अधिक होते. रविवारी देखील कमाल तापमानाने ४१ अंशाचा पारा गाठला होता, जो सरासरीपेक्षा ८ अंश अधिक होता. तसेच ठाणे उपनगरात देखील तापमान ४३.६ अंश सेल्सिअस इतके होते.
[yuzo_related]
सध्या, उच्च आर्द्रतेमुळे हवामान अत्यंत अस्वस्थ आहे. तसेच जसा दिवस पुढे सरकेल तसे तापमानही वाढणारच आहे. त्यामुळे दिवसा उष्ण परिस्थिती कायम राहणार.
हवामानतज्ञांच्या अनुसार सध्या पूर्वेकडून प्रामुख्याने तेलंगाणा व विदर्भाकडून येणारे उष्ण वाऱ्रे दिवसाच्या तापमानात होणा-या वाढीसाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत.
पण आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे. दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास वाहणारे वारे रविवारी दुपारी उशिरा म्हणजेच ३ च्या सुमारास वाहण्यास सुरुवात झाली ज्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ दिसून आली. सोमवारी जर समुद्राकडून वाहणारे वारे दुपारी लवकर सुरु झाले, तर तापमानात थोडी घट अपेक्षित आहे. तथापि ही घट १ किंवा २ अंशा पेक्षा जास्त अपेक्षित नाही. ज्यामुळे हवामानज्ञांचा अंदाज आहे की मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील 24 तासांपर्यंत उष्णता कायम राहील.
गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।
आज दुपारी 2:30 वाजता मुंबई उपनगरात नोंदवण्यात आलेले तापमान पाहुयात
कोलाबा येथे 39 अंश सेल्सीअस, दादर आणि सांताक्रूझ येथे 40 अंश सेल्सीअस, बदलापूर आणि बोरीवली येथे 42 अंश सेल्सीअस, पनवेल येथे 43 अंश सेल्सीअस व सर्वाधिक तापमान 44 अंश सेल्सीअस ठाणे आणि भिवंडी येथे नोंदवण्यात आलेले आहे.