एक आठवड्यापूर्वी असलेली पावसाची ४३ टक्क्यांची तूट २३ जून रोजी ३८ टक्क्यांवर आली आहे. देशाच्या वातावरणाची परिस्थितीची आम्ही आधीच वर्तविल्यानुसार सध्या अनुभवण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून मॉनसूनमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि सलग चौथ्या दिवशी मॉनसूनच्या सीमेने उत्तरेकडे प्रगती केली आहे.
नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल मध्य महाराष्ट्राच्याआणखी काही भागात, मराठवाड्याच्या बहुतांश भागात व विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागात झाली आहे. प्रामुख्याने आता मॉनसून रेषा रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, पेन्द्र, वाराणसी व बहिराईच मार्गे जात आहेत.
पुढील २-३ दिवसात मॉनसून मुंबई आणि छत्तीसगड आणि पूर्वेकडील उत्तर प्रदेशच्या काही भागांसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याची शक्यता आहे.
मॉनसून पुढे सरकल्यामुळे, मध्य भारतावर प्रामुख्याने महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटकचा किनारी भाग, अंतर्गत कर्नाटक आणि आसपासच्या उत्तर तेलंगाणात देखील पावसाळी गतिविधींमध्ये वाढ दिसून येईल. पुढील २४-४८ तास पूर्व भारतातील काही भाग जसे बिहार आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागांमध्ये चांगला पाऊस पडत राहील.
आधी वर्तविल्यानुसार, हा काळ मॉनसूनचा सर्वोत्तम कालावधी (२१ जून ते ३० जून) आहे असे दिसते. मध्य, दक्षिण आणि पूर्वेकडील भारतामध्ये पिकांची पेरणी करावी. खाली दर्शविलेल्या कोष्टकानुसार या क्षेत्रांमध्ये मातीतला ओलावा सुधारलेला दिसून येत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतील आर्द्र वारे मध्य आणि उत्तरपश्चिम भारतामध्ये पोहोचत आहे ज्यामुळे जमिनीतील ओलावा आणखी सुधारण्याची शक्यता आहे. ३१ मे ते १७ जूनपर्यंत माती ओलावा सुधारणेची तुलना येथे आहे. निळा रंग मातीतील ओलावातली वाढ दर्शवत आहे.
तथापि, मॉनसूनची एकंदर कामगिरी खूपच कमकुवत राहिली आहे आणि संपूर्ण देश पर्जन्यवृष्टीची मोठी तूट अनुभवत आहे. मध्य भारत, जेथे मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असणारी शेती आहे तिथे आतापर्यंत पावसाची ५०% तूट आहे आणि सध्या जर आपण या क्षेत्रातील जलाशयांची स्थिती पाहिली तर एकूण १२ जलाशयांपैकी १० त्यांच्या दीर्घकालीन सरासरी क्षमतेपेक्षा ४०% कमी आहेत.
दक्षिण भारत बद्दल बोलायचे तर या भागाचे देशातील मॉनसून पावसात सर्वात मोठे योगदान असते, येथे पावसाची कमतरता ३५ % आहे आणि ३१ पैकी ३० जलाशयांमध्ये त्यांच्या दीर्घकालीन सरासरी क्षमतेपेक्षा ४०% कमी साठा आहे.
उत्तर, पश्चिम आणि पूर्वेकडील भारतात देखील समान परिस्थिती आहे. खालील सारणी मॉनसूनच्या पावसामुळे देशातील जलाशयांच्या धोक्याची स्थिती स्पष्टपणे दाखवत आहे.
देशातील मॉनसूनवर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रात असेलेली पावसाची कमतरता निश्चितच चिंताजनक आहे. तथापि, पुढील ३-४ दिवसांत दक्षिण, मध्य आणि पूर्व भारता चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याने या तीनही क्षेत्रांमध्ये पावसाची तूट थोडी कमी होण्याची शक्यता आहे आणि जलाशयांच्या साठवण क्षमतेमध्ये देखील किंचित सुधारणा होईल. आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की सोयाबीन, भात आणि कापूस यासारख्या खरीप पिकांच्या पेरणीसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
साधारण २५ जूनच्या आसपास व त्यानंतर मुंबईत पाऊस पडेल. या आठवड्यात होणारा पाऊस शहरातील पाण्याची समस्या कमी करेल आणि या आठवड्यात एक दोन वेळेस जोरदार पाऊस देखील पडू शकतो. परंतु दुर्दैवाने चेन्नईत पुढील दोन आठवड्यांमध्ये पाऊस पडणार नाही त्यामुळे शहरातील पाण्याची परिस्थिती बिकट राहील.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे