Skymet weather

[Marathi] MD Skymet, Jatin Singh: देशात सक्रिय मान्सूनची परिस्थिती राहणार; मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत कमकुवत पावसाळी गतिविधी सुरु राहणार; चेन्नई आणि दक्षिण भारतातील इतर भागांना दिलासा

August 20, 2019 10:57 AM |

Monsoon in India

स्कायमेटच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आणि हा पाऊस मुख्यतः मध्य भारतात नोंदवला गेला. मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. जुलैअखेर झालेल्या मान्सूनच्या दमदार पावसामुळे हंगामाच्या सुरुवातीस असलेली देशातील पावसाची कमतरता भरून निघून आता सरासरीच्या तुलनेत २ टक्के अतिरिक्त झाली आहे.

स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत देशात आतापर्यंत ६१२.१ मिमीच्या तुलनेत ६२६ मिमी पाऊस पडला आहे. मध्य भारतात, एकूण पाऊस आता सरासरीच्या १५% अतिरिक्त आहे. दक्षिण द्वीपकल्पात देखील मान्सूनचा पाऊस सरासरीच्या ५% अतिरिक्त आहे. मात्र ईशान्य आणि पूर्व भारतामध्ये अजूनही पावसाची १५% तूट आहे. तर गेल्या सप्ताहात जोरदार पाऊस अनुभवणाऱ्या उत्तर पश्चिम भारतातील पावसाची तूट आता २ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जवळील भविष्यातही पाऊस सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे.

Rainfall-Deficiency-In-India

मान्सून सक्रिय राहणार

आधी हवामान प्रारूपे दीर्घ कोरड्या हवामानाचे दृश्य दर्शवित होते परंतु सद्य परिस्थिती पूर्णपणे भिन्न परिस्थितीकडे लक्ष वेधत आहे. संख्यात्मक प्रारूपांचा अनुमान आता अलीकडील भूतकाळातील निर्देशकांपेक्षा भिन्न आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात चढउतार ENSO तटस्थ स्थितीत असल्याचे दर्शवित आहे. दुसरीकडे, हिंद महासागरात आयओडी आपली स्थिती कायम ठेवून आहे. पॅसिफिकमधील एल निनोची घसरण झालेली स्थिती आणि आयओडी चे मजबुतीकरण हे एकत्रित सक्रिय मान्सूनची हमी देत आहे.

प्रामुख्याने मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात सक्रिय पावसाळ्याची परिस्थिती असण्याची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडेल, तर या राज्यांतील बऱ्याच भागात मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. या आठवड्यात ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात बऱ्याच भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, या राज्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

हरियाणा, पंजाब, राजस्थान, सौराष्ट्र व कच्छ आणि उत्तरेकडील डोंगरामध्ये पावसाळी गतिविधींमध्ये घट दिसून येईल. तर दक्षिण द्वीपकल्प-तामिळनाडू, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही भागात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मध्यम ते हलका पाऊस सुरूच राहील.

पश्चिम घाटावर मात्र मुसळधार पावसाची अपेक्षा नाही, अन्यथा देशातील सर्वाधिक पावसाचा भाग मानला जाईल. मुंबईत या आठवड्यातही पावसाळी गतिविधींची उणीव राहील.

पावसामुळे चेन्नईकरांना दिलासा

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईला काहीसा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरवातीस चेन्नई व त्याच्या आसपासच्या भागात जोरदार सरी बरसत राहतील.

पिकांवर परिणाम

सध्या बहुतेक पिके फुल धारणेच्या अवस्थेत आहेत. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य महाराष्ट्रात, मध्य प्रदेशातील काही भागात, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाची नोंद झालेल्या भागांत क्रॉप विल्टिंग आणि मूळं सडण्याचे प्रकार दिसून आले आहे. गेल्या पंधरवड्यात चांगला पाऊस पडल्याने मातीला पुरेसा ओलावा मिळाला आहे जो पिकांना उपयुक्त ठरेल. तथापि, या टप्प्यावर जास्त पावसाचा पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो कारण बहुतेक पीक फुल धारणेच्या अवस्थेत असतात आणि जास्त पावसामुळे फुलं गळून पडतात व शेंगामध्ये दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो.

Image Credits – Daily Star

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try