Skymet weather

[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: १५ जुलैनंतर मान्सूनमध्ये खंड पडणार. जूनमध्ये कमकुवत पावसामुळे कडधान्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम. या आठवड्यात चांगला पाऊस परंतु १० जुलैनंतर पावसात खंड उद्भवण्याची शक्यता असून मुंबईत पावसाचा जोर कमी होणार. पुढील पंधरवड्यात उत्तर प्रदेशात व उत्तरपूर्व भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे

July 8, 2019 5:36 PM |

Monsoon and farmers in India

गेल्या एक आठवड्यात जोरदार पावसाळी गतिविधी अनुभवल्यानंतर आता मान्सूनच्या पावसात थोडा वेळ खंड पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत देशाच्या बहुतेक भागांवर पावसाळी गतिविधी कमकुवत असतात व हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या उत्तराखंड ते पूर्वोत्तर भारतपर्यंत जोरदार पाऊस पडतो. येत्या १५ जुलै पासून अशी परिस्थिती अनुभवण्यात येईल.

उत्तरप्रदेश आणि आसपासच्या मध्यप्रदेशावरील कमी दाबाचा पट्टा लवकरच संपुष्टात येणार आहे, परिणामी मध्य भारतात पावसाचा जोर ओसरेल. याशिवाय, सध्या गंगेच्या मैदानी प्रदेशातून जाणारी ट्रफ रेषा देखील हिमालयाच्या पायथ्याकडे सरकत आहे यामुळे या भागात पावसात वाढ होईल. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, गुजरात, महाराष्ट्रातील बहुतेक भाग आणि संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पात १५ जुलै पासून पावसाळी गतिविधी कमी होतील.

मुंबईत आठवड्याच्या मध्यांतरात पावसाचा जोर ओसरणार, कमकुवत पावसाळी गतिविधी

दरम्यान, २८ जून ते २ जुलै दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस अनुभवण्यात आला पण आता येणाऱ्या काही दिवसांत मुंबईकरांना पावसापासून थोडी उसंत मिळणार आहे. पुढील २-३ दिवस म्हणजे १० जुलैपर्यंत मुंबई आणि उपनगरात काही जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हा जोरदार पाऊस मागील काही दिवस अनुभवण्यात आलेल्या सतत होत असलेल्या पावसासारखा नसून काही काळ म्हणजेच २-३ तासांकरिता असेल. तथापि, या पावसामुळे बऱ्याच भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची आणि रस्ते जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईमध्ये जुलै महिन्यात पहिल्या ८ दिवसातच सरासरी ८४०.७ मिमी च्या तुलनेत ६७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि येत्या दिवसात उर्वरित १६३ मिमी पावसाचे लक्ष्य काबीज करण्याच्या मार्गावर आहे.

मुंबईत ११ जुलै नंतर पावसाचा जोर कमी होईल, परंतु जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याकाळात, अरबी समुद्रात एक विपरीत चक्रवाती प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विषुवृत्तीय प्रवाह कमकुवत होईल आणि वायव्येकडून वारे वाहतील आणि परिणामी मुंबईमध्ये जवळपास एक आठवडा पाऊस होण्याची शक्यता नाही. तथापि, शहराच्या काही भागात २०-३० मिमी पर्यंत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि बातमी मागील एक आठवड्यापासून मुसळधार पावसाळा झेलणाऱ्या मुंबईकरांना निश्चितच दिलासा देणारी आहे

पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता

उत्तरप्रदेश, बिहार आणि आसामसारख्या पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये या आठवड्यात मुसळधार पावसासाठी तयार असले पाहिजेत. उत्तर प्रदेशमध्ये विशेषतः रामपूर, लखीमपूर खेरी, बलरामपूर, गोंडा आणि बाराबंकी या जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये देखील १२ जुलैनंतर मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम चंपारण, गोपालगंज, सीतामढी, मधुबनी, खगारिया, माधेपूरा आणि सुपॉल हे जिल्हे कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला थोड देण्यासाठी तयार असले पाहिजे.

दरम्यान याच काळात पूर्वोत्तर भारतातील आसाममध्येही जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यात पूर येण्याची भीती वाढली आहे. जोरहाट, गोलाघाट, धेमाजी, कचर, बारपेटा, करीमगंज आणि सोनीतपूर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित होण्याची अपेक्षा आहे. म्हणून निवासी आणि सरकारी अधिकारी यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

जूनमध्ये खराब मान्सूनमुळे कडधान्यांची पेरणी प्रभावित

जून महिन्यात देशभरात पाऊस सरासरीच्या तुलनेत खूप कमी नोंदला गेला. स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार संपूर्ण जून महिन्यात पावसाची कमतरता राहीली. पाऊस कमी झाला आणि तूट वाढत राहिली आणि जूनच्या अखेरीस संचयीत तूट ३३ टक्के होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला असला तरी बहुतेक भागात मॉन्सूनच्या खराब प्रदर्शनामुळे पिकांची पेरणी लांबल्यामुळे शेतकरी प्रभावित झाले.

स्कायमेटच्या उपलब्ध माहितीनुसार, कडधान्यांची पेरणी जून आणि जुलैमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ७२% नी घसरली आहे. ५ जुलैपर्यंत, मागील वर्षीच्या २७.९१ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत या वर्षी फक्त ७.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.

पावसाच्या कमतरतेमुळे सर्व प्रमुख डाळी उत्पादक राज्यांत पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सुमारे २८.८५ लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या राजस्थान राज्यावर याचा सर्वात वाईट परिणाम झाला आहे.

सन २०१८ मध्ये ५.६९१ लाख हेक्टर जमिनीच्या तुलनेत आतापर्यंत राज्यातील पेरणी २.८८५ लाख हेक्टरवर झाली आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावित राज्य असून गेल्या वर्षीच्या ५.६४३ लाख हेक्टरच्या तुलनेत केवळ ०.३७३ लाख हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे. खाली दिलेली तुलनात्मक सारणी जून ते ५ जुलै दरम्यानच्या पाच वर्षात राज्यातील डाळींच्या पेरणीबद्दल माहिती देते.

Kharif crops
८ जुलै रोजी खरीप पिकांच्या अंतर्गत प्रगतीशील क्षेत्राचा विस्तार

सर्व कडधान्यांमध्ये, तुरीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पेरलेल्या ३.६९ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत या वर्षी केवळ ०.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. साधारणपणे तुरीची पेरणी जून महिन्यात सुरु होते आणि जुलैमध्ये संपते. तूर पिकासाठी वेळेत पेरणी करणे महत्वाचे आहे कारण पेरणीमध्ये विलंब झाल्यामुळे उत्पादनात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

तथापि, एक आठवड्यासाठी देशाच्या काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. या कालखंडात (१०-१६ जुलै) पूर्व भारतात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून मध्य भारतात तर आधीच चांगला पाऊस नोंदला जात आहे. यामुळे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, ओडिसा आणि उत्तरप्रदेश सारख्या राज्यांमध्ये कडधान्यांची पेरणी वाढण्याची शक्यता आहे.

Image Credit: NDTV

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try