गेल्या आठवड्यात देशातील बर्याच भागांमध्ये महत्त्वपूर्ण हवामान विषयक गतिविधी अनुभवण्यात आल्या. आठवड्याच्या सुरूवातीस २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी देशाच्या पूर्वेकडील आणि ईशान्येकडील भागात मोठ्या प्रमाणात जोरदार गडगडाटी गतिविधी झाल्या. बिहारमध्ये मुंगेर, गोपाळगंज, जामोई, बांका, भरतपूर आणि औरंगाबाद येथे विजांचा कडकडाटासह गारपीट झाली. या अवकाळी घटनेमुळे ११ लोकांचा बळी गेला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
झारखंडमधील पलामू आणि डाल्टनगंजमध्ये २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या जोरदार गारपीटीमुळे गेल्या ६० वर्षातील गारपिटीचा विक्रम मोडीत निघाला. जोरदार वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या क्षेत्रावरील पिके प्रभावित झाली. ओडिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांत देखील प्रतिकूल हवामानाची परिस्थिती अनुभवण्यात आली. देवगड, कंठपाडा, मलकनगिरी व रायपूर उपविभागात मुसळधार पाऊस व गारपीट झाली. आठवड्याच्या शेवटी देखील उत्तर भारतातील डोंगराळ आणि मैदानी भागांत सक्रिय हवामानाची परिस्थिती दिसून आली. यामुळे दिल्ली-एनसीआरसह प्रदेशासाठी फेब्रुवारीची सांगता पावसाळी गतिविधींनी झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील भागांमध्ये पावसाचे आधिक्य राहिले, तर दक्षिण द्वीपकल्पात तूट राहिली. हिवाळ्यातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील सामान्य ४०.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ४०.२ मिलिमीटर पावसाची नोंद केली गेली.
दरम्यान २ मार्चपासून सुरू होणारा आठवडा आशादायक दिसत असून गुजरात आणि कर्नाटक वगळता बहुतेक भागांत पावसाची शक्यता आहे. येत्या ५ व ६ मार्च रोजी वादळी गतिविधी आणि गारपिटीसह जोरदार वारे वाहतील आणि त्याचा परिणाम देशाच्या उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील भागांवर होईल. हलका किंवा मध्यम पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरू शकेल, परंतु जोरदार वाऱ्यासह अपेक्षित गारपिटीमुळे बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशाच्या पूर्वेकडील भागांसाठी निश्चितच नुकसानकारक ठरू शकेल.
उत्तर भारत
मैदानी तसेच डोंगराळ भागांत आठवड्याची सुरवात सौम्य गतिविधींनी होणार असून २ आणि ३ मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून ४ मार्चला एक नवीन पश्चिमी विक्षोभाचे आगमन होणार आहे. या हवामान प्रणालीसह राजस्थानातील प्रेरित झालेल्या कमी दबावामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमधील अनेक भागात ४ मार्चपासून ७ मार्चपर्यंत बऱ्याच भागांत तीव्र व व्यापक गडगडाटी गतिविधींसह गारपीट होईल. तसेच उत्तर भारताच्या डोंगराळ भागात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. त्यामुळे स्कायमेटने संपूर्ण प्रदेशासाठी ऑरेंज इशारा जारी केला.
पूर्व आणि ईशान्य भारत
मागील आठवड्यात बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पिकांचे नुकसान ताजे असताना लागोपाठ प्रतिकूल हवामानाचा परत एकदा फटका या भागांना बसण्याची अपेक्षा आहे. दरम्यान ४ ते ८ मार्च दरम्यान बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीटी व वादळी वार्याची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. या गतिविधींची तीव्रता ५ व ६ मार्च रोजी राहण्याची अपेक्षा आहे.
ईशान्य भागात अनेक ठिकाणी विशेषत: अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय येथे विजांच्या कडकडाटासह पावसाळी गतिविधी अनुभवल्या जातील.
मध्य भारत
संपूर्ण आठवडाभर गुजरातमध्ये वातावरण कोरडे राहिल. उत्तर आणि पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये आठवड्याच्या पूर्वार्धात हलक्या पावसाची अपेक्षा आहे. ह्या गतिविधींचा जोर वाढून विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धात ५ व ६ मार्च रोजी मेघगर्जनेसह गारपीट आणि जोरदार वारा अनुभवला जाण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण द्वीपकल्प
या आठवड्यात दक्षिण द्वीपकल्पात तुरळक हलका पाऊस होईल. मान्सूनपूर्व पावसाची चाहूल देणाऱ्या हलक्या सरी केरळ आणि उत्तर कर्नाटक राज्यात आठवड्याच्या उत्तरार्धात पडतील. आठवड्याच्या उत्तरार्धात तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तसेच तामिळनाडूतही हलका पाऊस आणि गडगडाटी परिस्थिती राहील. तामिळनाडू आणि केरळमध्ये वाढणारे तापमान, मान्सूनपूर्व परिस्थितीची आठवण करून देत आहे.
दिल्ली एनसीआर
येत्या ४ ते ७ मार्च दरम्यान गडगडाटासह मुसळधार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता असून ५ आणि ६ मार्च रोजी गतिविधी अधिक तीव्र असतील. किमान तापमान १५ ते १७ अंश राहील तर कमाल तापमान २८ अंशावरून २५ अंशांपर्यंत खाली येईल.
चेन्नई
आठवड्याच्या उत्तरार्धात अंशतः ढगाळ आकाश आणि अधून मधून हलका पावसामुळे उष्ण व दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश आणि २० अंशांच्या आसपास असेल.
तळटीप: या आठवड्यापासून देशात मान्सूनपूर्व हंगामाला सुरूवात होत आहे.