हवामान अंदाज 19 जून: दक्षिण कोंकण व गोव्यामध्ये मॉन्सूनची प्रगती, विदर्भात पावसाची शक्यता

June 18, 2019 7:02 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत ट्रफ रेषा विस्तारलेली आहे ज्यामुळे केरळ आणि कर्नाटकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. तसेच, गंगीय पश्चिम बंगाल पासून उत्तर तटीय ओडिशा पर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारलेली आहे. यामुळे आंध्रप्रदेश मध्ये पावसाचा जोर वाढेल.

बंगालच्या खाडीपासून आर्द्र वारे पूर्वोत्तर भारतात वाहत आहे. अशा प्रकारे, मणिपूर, मिझोरम आणि नागालैंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. उत्तर-पूर्व भारतात, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किम येथे विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. बिहारच्या काही ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे, ज्यामुळे गरम हवामानाच्या परिस्थितीतून काही काळ सुटका मिळेल.

मध्य भारतात, एक ट्रफ रेषा उत्तर प्रदेश पासून दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण पूर्व राजस्थान आणि गुजरात मध्ये पावसाची अपेक्षा आहे. कोंकण व गोव्या मध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या काही भागात आणि विदर्भ मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

उत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर प्रदेशावर बनलेली आहे ज्यामुळे पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश मध्ये पावसाची अपेक्षा आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मध्ये धुळीचे वादळ दिसतील. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. दिल्ली मध्ये ढगाळ आकाशासह तापमानात वाढ दिसून येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES