चिलीत तब्बल ४२ वर्षांनी काल्बुको ज्वालामुखीने आपले उग्र रूप धारण केले आणि त्यामुळे धूर आणि धुळीचे ढग आकाशात दूरवर पसरलेले दिसत होते.
चिलीतील राष्ट्रीय आंतरिक आपत्कालीन मंत्रालयाने (ONEMI) प्युरटो वरास आणि प्युरटो मोंट येथील लोकांना धोक्याची सूचना दिलेली असून आतापर्यंत १५०० लोक स्थलांतरित करण्यात आले आहे, हे सर्व करणे आधीच शक्य झाले कारण तेथील अधिकारी नियमितपणे याचे निरीक्षण करत होते.
चिलीतील माईन एंड जीओलोजी या संस्थेने त्यांच्या वतीने धोक्याची सूचना जाहीर केली होती, तसेच ज्वालामुखी क्षेत्रात सर्वांसाठी जाण्यास मज्जावही केला होता. त्याबरोबरच चिलीतील शेक्षणिक मंत्रालयाने ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अंदाज घेऊन वर्ग न घेण्याचे आदेश दिलेले आहेत. या ज्वामुखीचा परिणाम विमान सेवेतही झालेला दिसून आला, आतापर्यंतच्या माहितीनुसार प्युरटो मोंट या दिशेला जाणाऱ्या ३ विमानांची उड्डाण स्थगित करण्यात आलेली आहेत.
काल्बुकोचे केंद्र हे लॉस लोगास ह्या अत्यंत घनदाट वस्तीच्या ठिकाणी आहे. या आधी काल्बोकुचा उद्रेक १९७२ साली झाला होता.
आता झालेला ज्वालामुखी हा मार्च २०१५ झालेल्या विलारीका या ज्वालामुखी पेक्षा अधिक तीव्रतेचा आहे. ONEMI ने विलारीका साठी पूर्व धोक्याची सूचना दिलेली आहे.