मागील काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राला थोडी विश्रांती दिल्यानंतर, आता पुन्हा एकदा गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे.
गेल्या २४ तासात हर्णे येथे सर्वाधिक ८२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे, तसेच बीड येथे ८०.४ मिमी, सातारा ६७.४ मिमी, सांगली ५३ मिमी, विजापूर ५१.४ मिमी, यवतमाळ २७ मिमी, भिरा २७ मिमी आणि पुणे २२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. मुंबईत मात्र दोन्ही वेधशाळांनी गेल्या २४ तासांत पावसाची नोंद केलेली नाही.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात कोकण-गोवा आणि मध्य-महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच, पुणे, नाशिक, रत्नागिरी, हर्णे आणि महाबळेश्वर येथे काही ठिकाणी एक-दोन जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
शिवाय, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल असे अपेक्षित आहे, असे असले तरी बऱ्याच भागात तुरळक सरींची शक्यता नाकारता येत नाही.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com