स्कायमेटच्या हवामानतज्ञांच्या अंदाजानुसार, कोकण व गोवा आणि मध्य-महाराष्ट्रातील बहुतेक भागात तापमान सध्या सामान्यपेक्षा खाली आहेत. मुंबईत देखील दिवसा आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले गेले आहे.
[yuzo_related]
तथापि, वाऱ्यांची दिशा आता बदलणार असून आता या थंड वाऱ्यांची जागा गरम वारे घेतील असे अपेक्षित आहे. तसेच विदर्भातील तापमान देखील आधीच 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे आता कोकण व गोवा आणि मध्य-महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढेल.
प्रामुख्याने २४ ते ४८ तासांनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक व पुण्यातील कमाल तापमान ४ ते६ अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई आणि जवळपासच्या भागात देखील येत्या काही दिवसांत ६ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ अपेक्षित आहे.
गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।
रत्नागिरी, भिरा आणि ठाणेसारख्या तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधे देखील खूप गरम आणि उबदार हवामान अनुभवले जावू शकते. किनारी भागात उच्च आर्द्रता व उच्च तापमानांमुळे वातावरणात अस्वस्थता वाढण्याचे शक्यता देखील आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून , या सर्व प्रदेशांतील नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.