Skymet weather

[MARATHI] भारतातील आंबा निर्यातदारांवर कठीण काळ

May 5, 2015 2:59 PM |

Mangoभारतातील रसाळ आंबे खाण्याची मजाच काही निराळी असते, पण या वर्षी मात्र परदेशी तसेच भारतीय ग्राहकाला या रसाळ आंब्याची चव चाखणे प्रचंड महाग ठरणार आहे. भारत हे जगातील आंबा उत्पादनाचे महत्वाचे ठिकाण आहे. यंदा भारतात आलेल्या अवकाळी पावसाने पिकांची खूपच नासधुस झालेली आहे. त्याला आंबा तरी अपवाद कसा ठरेल. उत्तर भारत आणि किनारपट्टीतील राज्यातून होणारा आंब्याचा पुरवठा देखील कमी झाला आहे. त्यामुळे आंब्याची किमंत खूप वाढलेली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारातील भारतीय आंब्याच्या मागणीवर होवू शकतो.

देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात हे राज्य आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत परंतु या राज्यात अवकाळी पावसाने ५०% पिकांचे नुकसान झाले आहे. परदेशात मागणी असलेले मालदा, हापूस, केशर, लंगडा तसेच चौसा या आंब्यांच्या प्रकारांचे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खूप नुकसान झाले आहे.

भारताला सशक्त आंबा निर्यातदार होण्यासाठी नेहमीच झगडावे लागले आहे. यंदा आंब्याची निर्यात ३०% कमी झाली आहे, कारण अवकाळी पावसाने चांगल्या प्रतीच्या आंब्याचा पुरवठा झाला नाही. याचा परिणाम म्हणून या वर्षी जागतिक बाजारातील निर्यातदारांवर टांगती तलवार आहे.

किमतीचा परिणाम

सद्यस्थितीत आंब्याचा राजा असणाऱ्या हापूस आंब्याची किमत ५०० ते १००० रुपये प्रती डझन आहे. जर दमट हवा व पाऊस असाच सुरु राहिला तर आंब्याचा या किमती ३०% वाढू शकतात. आंब्याच्या पुरवठ्याचा तुटवडा हा भारतातील तसेच जागतिक बाजारातील आंब्याच्या किमती गगनाला भिडवण्याची शक्यता आहे. मुंबईतील घाऊक बाजारात निर्यातीची गुणवत्ता असलेल्या आंब्याची ५ डझनाची पेटी २८०० ते ३५०० रुपये या दराने विकली जात आहे. हि किमत मागील वर्षीच्या किमतीच्या जवळ जवळ दुप्पट आहे.

भारतातील आंबा हा मुखत्वे करून युरोप, संयुक्त अरब अमिराती, कतार, व्हिएतनाम आणि सौदी अरेबिया येथे निर्यात होतो.

Image Credit: Indiatvnews.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try